दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी- समाधान कळम
वडोद तांगडा:- नुकत्याच झालेल्या एच एस सी परीक्षा-2023 परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यामध्ये दिपभारती उच्च माध्यमिक विज्ञान शाखेचा निकाल 100% लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ९६.६६% लागलेला आहे.
यामध्ये विज्ञान शाखेत कु. पुनम विष्णू तांगडे 83.67%(प्रथम), अभय सुभाष दळवी 82.83% (द्वितीय), कु.कोमल भावसिंग गोमलाडू 82.17%(तृतीय) क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर कला शाखेतून कु पल्लवी सारंगधर जगताप 74.67%(प्रथम), कु. सुषमा सुनिल तांगडे 73.33%(द्वितीय), कु. वैशाली राजु सुलताने 70.33%(तृतीय) गुणानुक्रम मिळवून उत्तीर्ण झाले आहेत
या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सम्राट अशोक शिक्षण संस्था भोकरदन संस्थेचे अध्यक्ष श्री सुदामराव सदाशिवे, संस्थेचे सचिव दिपकभैय्या सदाशिवे तथा विद्यालयाचे प्राचार्य श्री एस. टी. कर्वे व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


