दैनिक चालू वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि: अन्वर कादरी
मुख्यमत्र्यांचा प्रस्ताव प्रधान सचिवा कडे
औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंजुर डॉक्टर-नर्स यांची पदे,सुपरस्पेशालिटीची पदे अँजिओप्लास्टी व इतर महत्वपुर्ण ऑपरेशन होणे कामी तात्काळ भरण्याचे आदेश निर्गमीत व्हावेत अशी मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉजचे सचिव शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी सदरचा प्रस्ताव पुढील कारवाई साठी वैद्यकीय शिक्षण विभागाचा प्रधान सचिव अश्विनी जोशी यांचे कडे पाठविला आहे.
या बाबत सविस्तपणे निवेदनात नमूद केले आहे की,औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंजुर डॉक्टर नर्स यांची पदे,सुपरस्पेशालिटीची पदे अँजिओप्लास्टी व इतर महत्वपुर्ण ऑपरेशन होणे साठी सदरची पदे भरणे रुग्ण संख्या वाढीमुळे अत्यावश्यक झाले आहे या बाबत तपशिलवार बाब अशी आहे की, सुपरस्पेशालिटीची १५० कोटींची इमारत १३ जून २०२० रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या ( घाटीच्या दवाखाना) ताब्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर राज्य सरकारने ८ जानेवारी २०२१ रोजी डॉक्टर,नर्सची २१९ पदे पहिल्या टप्प्यात भरण्यास मंजुरी दिलीअसतांना देखील अद्याप पदभरती झाली नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना अतिशय गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आवश्यक ती मंजुर पद भरती नसल्यामुळे अतिविशेष उपचार या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत नाही.राज्य प्रशासना च्या नाकर्तेपणामुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावून महागडे उपचार घ्यावे लागत आहे.
केंद्र सरकारने औरंगाबाद,लातूर, अकोला,यवतमाळ येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले आहेत. त्यासाठी सर्व यंत्रसामग्रीही दिली आहे मात्र, पद भरतीमुळे सर्वच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. सुपरस्पेशालिटी मध्ये आठ विशेष उपचाराचे विभाग आहेत. नर्सची ८१ पदे मंजूर असून केवळ एकच भरले आहे. डॉक्टरां अभावी ऑपरेशन करता येत नाही. सध्या ओपीडी, एमआरआय,डायलिसिस सुविधा अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे आणि विशेष बाब म्हणजे हृदयरोग विभागात डॉक्टर आहेत, मात्र इतर महत्वाचे कर्मचारी वर्ग ज्यात नर्स नसल्यामुळे अँजिओप्लास्टी होत नाही.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पीपीपीला विरोध होता, तत्कालीन वैद्यकीय शिक्षणमंत्री अमितजी देशमुख यांनी सुपरस्पेशलिटी च्या पीपीपी मॉडेलची घोषणा केली होती. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते म्हणुन देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला होता. नवे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पीपीपी मॉडेल रद्द केल्याचे औरंगाबाद मध्ये पहिल्याच पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेले होते.त्यानंतर सुपर स्पेशालिटीची पदे भरली नसल्यामुळे ऑपरेशन पूर्ण क्षमतेने उपचार होत नाहीत.
परिस्थितीचे गांभीर्य आणि वाढती रूग्ण संख्या पाहता अति तात्काळ औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे मंजुर डॉक्टर-नर्स यांची पदे, सुपर स्पेशालिटीची पदे अँजिओप्लास्टी व इतर महत्वपुर्ण ऑपरेशन होणे कामी भरण्याचे अति तात्काळ आदेश जनहितार्थ निर्गमीत व्हावेत अशी जनहितार्थ मागणी पीपल्स फोरम फॉर सोशल कॉज चे सचिव शहर विकासाचे जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी मुख्यमंत्र्यां कडे केली आहे.
औरंगाबाद शहराचे अनेक प्रलंबीत प्रश्न त्यांचें अथक लढ्यामध्ये मार्गी लागले असुन त्यात शहर पाणी पुरवठा योजना, हर्सूल गाळ घोटाळा, सिमेंट रोड, भुमीगत गटार योजना,नाले गाळ स्वच्छता अभियान, पाणी पट्टी पन्नास टक्के कमी करणे, औरंगपुरा फटाका कांड, बिबट्या मयत प्रकरण असे एक ना अनेक प्रश्न त्यांनी हायकोर्ट सुप्रीम कोर्ट मध्ये लढा देउन सोडविल्या मुळे त्यांचा शहर विकासात मोठा सहभाग आहे.


