दैनिक चालु वार्ता वैजापूर प्रतिनिधी– भारत पा.सोनवणे
वैजापूर-श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज विद्यार्थी आश्रम शिवुर येथे वै रंगनाथ स्वामी भिंगारे यांच्या आशीर्वादाने,ह भ प उत्तम महाराज सांळुके यांच्या मार्गदर्शनाखाली बालसंस्कार शिबिरात ह भ प भगवान महाराज ठुबे यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.यावेळी ते बोलत होते की, लहान वयात होणारे संस्कार कायमचे हृदयामध्ये ठाण मांडून बसतात.संस्कार ही अनंत जन्माची शिदोरी आहे.संस्कारातुन निर्माण होणारी संस्कृती माणसाला माणूस म्हणून उभी करते , आणि त्या संस्कृतीतून खरा धर्म साकार होतो यातुन माणुसकी,प्रेम निर्माण होते म्हणून बालसंस्कार गरजेचे आहे. जवळपास शिबिरात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.पंचविस दिवस अनेक अन्नदात्यांनी मुलांना जेवण दिले.ज्यांनी चांगला अभ्यास केला त्या विद्यार्थ्यांसाठी संतोष दळवी , त्रिंबक नाना शिरोडे, पांडुरंग शास्त्री , उत्तम आण्णा,सितामावशी गायकवाड यांनी रोख स्वरूपात बक्षीस दिले ,शिबिरात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज मधाने, प्रकाश महाराज कदम, कृष्णा महाराज आहेर,आदित्य महाराज लग्गड, भगवान महाराज ठुबे, बाळासाहेब जाधव सर , नवनाथ महाराज जाधव आदींनी परिश्रम घेतले,शिबीर यशस्वीतेसाठी गोरख महाराज सांळुके,जालिंदर पवार, रामभाऊ दादा जाधव,त्रिंबक डघळे, बाळासाहेब शेवाळे, प्रभाकर दारुंटे,यादव तात्या शिवाजी जाधव, बबनराव शिंदे सर, सारंगधर महाराज भोपळे,कारभारी जाधव, आदींनी प्रयत्न केले.काल्याच्या प्रसंगी श्री कैलासराव पवार कोल्हीकर यांनी महाप्रसाद दिला.


