
दैनिक चालु वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णु मोहन पोले
हाडोळती- फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत हाडोळती ता. अहमदपूर येथील कर्मयोगी तुळशीराम पवार कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 93 टक्के लागला असून या महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. कला शाखेचा निकाल 89.23%, वाणिज्य शाखेचा निकाल 95.83% ,तर विज्ञान शाखेचा निकाल94.59% लागला आहे. कला शाखेतून (1)गोताळे दयानंद संजय 83.66% प्रथम (2)मोरे ज्ञानेश्वर रमेश 77.50% द्वितीय(3) सूर्यकांबळे समीक्षा मोहन 71.50% तृतीय आली आहे. वाणिज्य शाखेतून (1)थोटे साक्षी शंकर 76.83% प्रथम(2) गादगे गजानन बालाजी 75.83% द्वितीय(3) करले हरीओम विनोद 72.66% तृतीय आला आहे. विज्ञान शाखेतून(1) बिरादार रोहित अंकुश 76.50% प्रथम( 2)फकीर सादिया गौस73.83% द्वितीय(3)कौडगावे बसवेश्वर गोविंद 70.83%तृतीय आला आहे .दयानंद उच्च माध्यमिक विद्यालय एम.सी.व्हि.सी. या विभागाचा निकाल 93 % लागला असून 33 पैकी 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. पी.टी. पवार सर,सचिव डाॅ. निलेश भैय्या पवार, प्राचार्य बच्चेवार डी .डी., प्राचार्य जोगदंड आय .एम.,
मुख्याध्यापक कानवटे अर्जुन ,पर्यवेक्षक प्रा. सूर्यवंशी एम.डी. पर्यवेक्षक प्रा. बिल्लापट्टे एस.टी. केंद्र संचालक प्रा. मुचाटे ए.आर. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व गावकरी यांनी अभिनंदन केली आहे.