
दैनिक चालु वार्ता माहूर ता.प्र. -विनोद भारती
माहूर -अवैध रेती तस्करीची विक्रमी वाढ झाल्याच्या पार्श्वभुमिवर अवैध रेती वाहतुकी विरोधात माहूर तहसिलदार किशोर यादव व त्यांच्या पथकाने धडक कारवाई करताना दोन टिप्पर जप्त केले असून नदीपात्रात जाणारा रस्तादेखील जेसीबीच्या साह्याने खोदून बंद केला आहे.
तहसिलदार माहूर यांच्यासह त्यांच्या पथकाने दि.२४ मे रोजी माहूर तालुक्यातील लांजी येथे ट्रक एम.एच.४० सी.डी. ३७१२ हे अवैध रेतीची वाहतूक करताना आढळून आल्याने महसूल विभागाच्या पथकाने त्यावर जप्तीची कार्यवाही करून पुढील कार्यवाहीसाठी तहसिल कार्यालय माहूर येथे जमा करण्यात आले आहे. तर दि.२५ मे रोजी तालुक्यातील पडसा घाटावर चक्क नदीपात्रातून रेतीची वाहतूक करताना एक टिप्पर जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जमा केले असल्याची माहीती देण्यात आली आहे..
*विशेष म्हणजे शासनाने रेतीसंदर्भातील नवा अध्यादेश* *काढल्यानंतर सर्वसामान्यांना स्वस्त दरात रेती उपलब्ध होईल अशी भाबडी आशा* *सर्वसामान्यांना लागली होती. परंतू अद्याप पर्यंत तसे काहीही न होता माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच घाटांवरून अवैध* *रेतीचोरीची वाहतूक विक्रमी प्रमाणात वाढलेेेली आहे* याकडे महसूल प्रशासन कानाडोळा करत असल्याची ओरड माध्यमांतून दैनंदिन होत होती . एकीकडे शेकडो वाहनांतून दिवसाढवळ्या व बिनदिक्कतपणे अवैध रेतीची वाहतूक केली जात असताना दोन दिवसात केलेल्या दोन धडक कारवायांमुळे नागरिका कडून समाधान व्यक्त करण्यात येत असून दररोज अशा कारवायांंची गरज nu असल्याची रास्त मागणी जनतेतून होत आहे.तहसील प्रशासनाकडून अवैध वाळू तस्करीला आळा घालून स्वस्त दरात वाळू जनते साठी उपलब्ध करावी अशी रास्त मागणी जनतेतून होत आहे…