
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी -राम चिंतलवाड
हिमायतनगर : शहरातील नामांकित असलेल्या हुतात्मा जयंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाने निकालांमध्ये यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा ८८.७५ टक्के व कला शाखेचा ८४.६१ टक्के निकाल लागला, यात यावर्षी मुलींनी सर्वाधिक बाजी मारली आहे. शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने इयत्ता बारावीचा निकाल अतिशय महत्त्वाचा मानला जात असतो त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते त्यामुळे राज्य शिक्षण मंडळांने दिनांक २५ मे रोजी दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल जाहीर केला. हुतात्मा जयवंतराव पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कला शाखेतून प्रथम क्रमांक कुमारी रोहिणी धर्मा कांबळे हिला ८८.३३ टक्के, द्वितीय कु . गड्डमवार तनवी सुरेश हिला ८५, तर तृतीय क्रमांक कु. पायल दशरथ कदम हिने ८४ मिळविले आहे तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. दळवे सानिका सदाशिव हिने ८३.१७, द्वितीय कु . मोनिका मारोती वारकड ७४, विठ्ठल गजानन राऊतवार ७४.८३ तर तृतीय क्रमांक युवराज परमेश्वर जगताप ह्याने ७२.८३ टक्के गुण संपादन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे हुतात्मा जयंतराव पाटील विद्यालयाच्या अध्यक्षा सूर्यकांता पाटील, सचिव अरुण कुलकर्णीसह सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक रणखांब, लक्ष्मण डाके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.