
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी –
उस्माननगर येथून जवळच असलेल्या कंधार तालुक्यातील शिराढोण येथील भीमाशंकर उच्च माध्यमिक विद्यालयाने या वर्षीही बारावीच्या निकालात यशाची उज्ज्वल परंपरा कायम ठेवली आहे.या निकालात विज्ञान शाखेतून चोंडे तन्वी ज्ञानेश्वर हीने ८३ टक्के गुण घेऊन प्रथम आली आहे.कोत्तावार शर्वणी रमेश हीने ८२ टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे तर बोगर प्रथमेश बालाजी ह्याने ८१.५० गुण घेऊन याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर कला शाखेतून मोरे गोविंद गिरमाजी ह्याने ७८ टक्के गुण घेऊन प्रथम आला आहे तर कदम शिवकन्या बापूराव हीने ७६ .८३ टक्के घेवून द्वितीय तर तारू विशाल बापूराव ७५ .३३ टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे .त्याच बरोबर वाणिज्य शाखेतून जमदाडे तम्मन्ना शिवाजी हिने ५१ .३३टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांकात आली व वाघमारे प्रतिभा रमेश हीने ५१.१७ टक्के गुण घेऊन द्वितीय आली आहे तर स्वामी ज्ञानेश्वरी सतिश हीने ४६.३३ टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे. तर या विद्यालयाचा निकाल ९७ टक्के लागला आहे.विद्यालयातील सर्वच उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे भिमाशंकर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयराम पाटील पांडागळे ,सचिव बालाजी पांडागळे,प्राचार्य खुशालराव पाटील पांडागळे,पर्यवेक्षक रामदास पांडागळे, प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी , पत्रकार बांधव व विद्यार्थ्यी पालक यांनी पास झालेल्या सर्व अभिनंदन केले आहे.