
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:रोजच्या जीवनात ओपीडी डॉक्टर ने दिलेल्या वेळेतच आणि अपॉइंटमेंट घेऊन दवाखान्यातच होत असते. आपणही कधी ना कधी ओपीडी साठी नंबर लावून बसलेलो आहोत. हे फोटो पाहून तुमच्या लक्षात येईल रस्त्यावरच बसून डॉक्टर गोरगरिबांचे आणि गावाकडील जनतेचे आरोग्य तपासत आहेत. गावाकडेच नाही तर मुंबईत सुद्धा प्रत्येकासाठी ऑफलाइन किंवा स्वरूपात स्वतःला उपलब्ध करून देतात.
हे डॉक्टर दुसरे कोणी नसून जे जे हॉस्पिटल मुंबईचे मेडिसिन हेड युनिट डॉक्टर मधुकर गायकवाड राहणार केसराळी तालुका बिलोली जिल्हा नांदेड हे आहेत. यांचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय नांदेड येथे झाले आहे. या शिक्षण संस्थेचे ब्रीदवाक्य come tolearn go to serve हे आहे. डॉक्टर मधुकर गायकवाड यांना जी शिकवण मिळाली ती प्रत्यक्षात उतरवत आहेत.
सात दिवसाच्या दिवाळी सुट्टी साठी गावी आल्यानंतर हे गावकरी लोकांना समजताच त्यांनी घरासमोर चेकउप साठी रांगा लावल्या. एक दिवस ते नातेवाईकाला भेटण्यासाठी दुसऱ्या गावी गेले असता तिथल्या लोकांना समजतात त्यांनी डॉक्टरमधुकर गायकवाड यांना रस्त्यावरच गाठले. आणि मग काय रस्त्यावर बसून डॉक्टर मधुकर गायकवाड यांनी त्या सर्व जनतेचे check-up केले. कित्येक राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पुरस्कार प्राप्त डॉक्टर मधुकर गायकवाड यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. असे डॉक्टर प्रत्येक गावात एक असो अशी चर्चा परिसरात होताना दिसत आहे.