
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- संजय गांधी निराधार,श्रावण बाळ,विधवा महिला,ज्येष्ठ नागरिक या गोरगरीब नागरिकांना जगण्यासाठी शासनाकडून मिळणारे मानधन चार चार महिने मिळत नसल्यामुळे यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे जगण्यासाठी त्यांना कोणता दुकानदार माल उधारी देईल का यांची जाणीव शासनाने ठेवावी व दरमहा शासनाच्यावतीने मानधन देण्यात यावे अशी विनंती करून निवेदन जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे व तहसीलदार कंधार यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते व्यंकटराव जाधव. पांडुरंग कंधारे .गजानन जाधव. शरद गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दर महिन्याचे मानधन दर महिन्याला देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे