
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी –
—————————————-
कंधार येथील प्रियदर्शिनी मुलींच्या ज्यू कॉलेजच्या इ. १2 वी सायन्स शाखेचा निकाल १००% लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ८0% लागला आहे . प्रियदर्शिनी मुलींच्या विद्यालयाने यावर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्यालयातील उत्तीर्ण विद्यार्थिनींचे संजय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार श्री ईश्वररावजी भोसीकर, संस्थचे सचिव मा. संजयजी भोसीकर, प्राचार्या सौ. राजश्री शिंदे पर्यवेक्षक श्री किरण बडवणे प्राध्यापक शिक्षक व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.