
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
देगलूर – देगलूर बिलोली मतदारसंघातील लोकप्रिय आमदार जितेश अंतापुरकर यांनी दैनिक चालु वार्ताच्या अंकास दिल्या शुभेच्छा.
वर्तमानपत्र हे लोकशाहीचा आधारस्तंभ असतो. वर्तमानपत्रांमध्ये समाजाचे प्रतिबिंब उमटत असतात अशा दैनिकाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या दुःखी कष्टी आणि ग्रामीण भागातील जनतेचा आवाज उमटत असतो.अशाअंकामध्ये शेतकरी, सामाजिक,शैक्षणिक,राजकीय,धार्मिक बातम्यांचा विशेष आढावा घेणारे वृत्तपत्र असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले देगलूर तालुक्यात काना कोपऱ्यात दैनिक चालु वार्ताचे वृत्तपत्र सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्या साठी शुभेच्छा दिल्या. व दैनिक चालु वार्ताच्या अंकास शुभेच्छा दिल्या. येणाऱ्या काळात देगलूर तालुक्यात नंबर एक वर दैनिक चालेल असा विश्वास आमदार जितेश अंतापूरकर यांनी यावेळी प्रकट केला.