
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि मंठा -सुरेश ज्ञा.दवणे.
मंठा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर प्रतिष्ठान मंठा च्या वतीने (ता.२७ ) शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ३७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी पोलीस उपनिरीक्षक आस्मान शिंदे , पत्रकार रंजित दादा बोराडे, नगरसेवक दिपक बोराडे, दत्ता हातकडके, पोलिस कॉन्स्टेबल कानबाराव हराळ,प्रशांत काळे यांच्यासह जनकल्याण रक्तपेढीतील डॉक्टर व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप गायकवाड , उपाध्यक्ष आकाश रिकामे, सचिव आदित्य मिसाळ,कोषाध्यक्ष गणेश मुळे,सहसचिव राहुल बनसोडे, अविष्कार मिसाळ, माऊली मिसाळ, शिवाजी रिकामे,राजेश गायकवाड, रणजित चाळक,बाळासाहेब महाजन, सुंदर हिंगे,बालू डोईफोडे,गणेश गायकवाड,शिवाजी हातकडके, कृष्णा मिसाळ,भाऊ तायडे, निवास कुरधने,आकाश चाळक,गणेश मिसाळ,बाळू मिसाळ, आकाश तायडे यांनी परिश्रम घेतले.