
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यातील तळणी येथील स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत यश संपादन केले. यामध्ये विज्ञान शाखेतून खंदारे प्रज्वल अश्रोबा ७६.५० टक्के ( प्रथम ) , राऊत पायल अमोल ७५.८३ टक्के ( व्दितीय ) तर खरात पल्लवी अशोक ७३.६७ टक्के घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे . विज्ञान शाखेचा ९९.२० टक्के व कला शाखा ८८.८८ टक्के तर एकुन ९५.१४ टक्के निकाल लागला. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष महेश आकात , मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे , लोणार संचालक भूषण मापारी , मंठा पत्रकार संघाचे संतोष दायमा , बालाजी कुलकर्णी, लोणार पत्रकार संघाचे उमेश कुटे , गट समन्वय के जी राठोड , अँड. दगडुबा निंबाळकर , ठोकसाळ केंद्रप्रमुख नामदेव पवार , प्राचार्य शिवराज सोळंके , प्रा. एकनाथ पवार , प्रा. भागवत भावसार , प्रा. उध्दव सदर , प्रा. दिपक बांडगे प्रा. झाकीर शेख , कैलास राऊत , शशिकांत इंगळे , पीयुष पगारिया , गजानन निर्वळ, बद्रीनाथ काकडे, शिवानंद जायभाये , सुनील राठोड , किशोर देशमुख यांच्यासह अनेकांनी कौतुक केले