
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील शेतकरी विठ्ठल त्रिबंक आघाव यांनी बैल जोडी विक्री करीता मंठा येथील आठवडी बाजारात आणली असता बाजारातून चोरी गेलेल्या बैलाचा अवघ्या २४ तासात शोध घेण्यात मंठा पोलीसांना आले यश. सविस्तर बातमी अशी कि पोलीस ठाणे मंठा येथे फिर्यादी विठ्ठल त्रिबंक आघाव रा. सरकटे वझर ता. मंठा यांनी त्यांचा किमान ८०,००० रू. किंमतीची बैलजोडी विक्री करण्या करिता दिनांक ५/५/२०२३ रोजी मंठा येथिल आठवडी बाजारात आणली असता व बैल विक्री न झाल्याने फिर्यादीने त्याचे बेल आठवडी बाजारातील दावणिला बांधुन भाजीपाला खरेदी करून आण्यास गेला असता फिर्यादीचे बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने फिर्यादीने पोलीस ठाणे मंठा येथे दिनांक २३/ ५ / २३ रोजी अज्ञात आरोपी विरूद्धफिर्याद दिल्याने पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होवून तपासकामी पोहेकॉ यू. एल. राठोड यांचेकडे देण्यात आला राठोड यांनी मा. पोलीस अधिक्षक साहेब, जालना मा. अप्पर पोलीस अधिक्षक साहेब श्री. डॉ. राहुल खाडे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बुधवंत साहेब, मा. पोलीस निरिक्षक संजय देशमुख साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. बलभिम राऊत साहेब, पोहेकॉ उत्तम राठोड, पोहेकॉ राजु राठोड, पोना शाम गायके, पोकों विजय जुबडे, होमगार्ड बालासाहेब राठोड यांनी फिर्यादीचे चोरिला गेलेल चैल अवघ्या २४ तासात शोधुन पोस्टे मंठा येथे आणून फिर्यादी आघाव यांच्या ताब्यात दिले.आघाव यांनी मानले पोलीसांचे आभार.