
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे तर उपसभापतीपदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठनेते गोपाळराव बोराडे यांची निवड झाली. बाजार समितीच्या सभागृहात झालेल्या सभापती उपसभापतीच्या निवडीनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया, नवनिर्वाचित सभापती जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, उपसभापती गोपाळराव बोराडे, ॲड. पंकज बोराडे, अंकुशराव अवचार, उत्तमराव राठोड, किसनराव मोरे,बाजार समितीचे संचालक संतोष वरकड, अण्णासाहेब खंदारे, कल्याणराव खरात, कल्याणराव बोराडे, दत्तप्रसाद बनसोडे, बाबाराव राठोड, पंजाबराव केंधळे, केशव महाराज सरकटे, सचिन राठोड, डॉ.दत्तात्रय काकडे, ज्ञानेश्वर माऊली वायाळ यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया म्हणाले की, जनतेने महाविकास आघाडीच्या मतदारांना भरघोस मतांनी निवडून दिले, मतदारांचा चांगला प्रतिसाद होता. लोकांना बदल घडवायचा असल्यामुळे बाजार समितीची सत्ता महाविकास आघाडीच्या हातात दिली त्यामुळे मागील काळात जे गैरव्यवहार झाले ते लोकांसमोर आणावी लागतील,कामे करताना कोणताही भेदभाव न करता शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित सभापती जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी सांगितले की, धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा विजय आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी तसेच जनतेने प्रचंड मेहनत घेतली आणि महाविकास आघाडीला यश मिळवून दिले, मागील दहा वर्षात बाजार समितीच्या कारभारामध्ये जी अनियमितता आली, जे गैरव्यवहार झाले ते निश्चितच चव्हाट्यावर आणणार असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी समोर आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव दिला जाईल. वसमत सेनगावच्या धर्तीवर हळदीचे मार्केट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार अशी ग्वाही दिली. उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मतदार संघातील जनतेच्या मनात भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. यापुढे भाजपने केलेले सर्व खोटे धंदे उघड करावयाचे आहेत, या मतदारसंघात आता कुणीही अन्याय सहन करणार नाही. शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाईल असे सांगितले. ॲड पंकज बोराडे यांनी आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार असून महाविकास आघाडीची वज्रमुठ कायम राहील असे ठामपणे सांगितले. यावेळी श्रीरंगअण्णा खरात, माजी सभापती सुरेश सरोदे, तुळशीराम कोहिरे,माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे, विवेक घारे, शरद बोराडे, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप बोराडे, माजी नगराध्यक्ष नितीन राठोड, नगरपंचायत गटनेते अचित बोराडे, विकास सूर्यवंशी, जे.के.कुरेशी, पप्पू दायमा, गजानन बोराडे, संतोष गधे, संजय नागरे, माऊली सरकटे, शरद मोरे यांची उपस्थिती होती.””””””””चौकट 1) धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय — सभापती ए.जे.बोराडे…. सर्व मतदारांनी महाविकास आघाडीला कौल दिला. हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे. सर्व कार्यकर्त्यांची मेहनत आणि जनतेच्या प्रेमामुळे महाविकास आघाडीला हे यश मिळाले. भाजपच्या काळात झालेली गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणार असे नवनिर्वाचित सभापती ए.जे.बोराडे यांनी सांगितले.”””””””””चौकट 2) भाजपच्या विरोधात प्रचंड रोष — गोपाळराव बोराडे.. बाजार समितीच्या या निवडणुकीत भाजपच्या विरोधात प्रचंड रोष दिसून आला. तालुक्यातील शेतकऱ्यांवर यापुढे अन्याय होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या संस्था विकणाऱ्यांना जनतेने धडा शिकविला असे उपसभापती गोपाळराव बोराडे यांनी सांगितले.