
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
सहकार क्षेत्राचा अगदी मायक्रो पध्दतीने अभ्यास करणारे ,जिल्ह्यांतील
ओबीसी चेहरा म्हणून ओळख असणारे व विद्यार्थी जीवनापासुच काॅंग्रेस प्रणीत एन.एस.यु.आय संघटनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन निवडणुक असो अथवा लोकसभा, विधानसभा, नगरपालिका कोणत्याही निवडणुकीमध्ये काॅंग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन सक्रिय सहभाग देणारे सर्वसमावेशक मनमिळाऊ नेते राजुरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पुन्हा एकदा चंद्रपूर ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.आगामी निवडणुकींच्या दृष्टीने हि निवड महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे.