
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर,वणी व आर्णी लोकसभेचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळूभाऊ उर्फ सुरेश धानोरकर यांचे आज दिनांक 30 मे रोज मंगळवार ला दिल्ली येथील मेदांता हॉस्पिटल मध्ये रात्री 2.30 च्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, त्यांच्या अचानक निघून गेल्याने चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात काॅंग्रेसजनांसह सर्वत्र शोककळा पसरलेली आहे.
आज त्यांचे पार्थिव शरीर नागपूर मार्गे वरोरा ,भद्रावती व चंद्रपूर येथे आणण्यात येणार आहे अशी माहिती कळली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांचेवर नागपूर येथे उपचार सूरू असताना तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दि. 28 मे च्या सकाळीच एअर ऍम्ब्युलन्स ने दिल्ली येथील हॉस्पिटल ला नेण्यात आले होते. परंतु मृत्यू शी झुंज देत असतानाच काल रात्री त्यांचे दुःखद निधन झाले .त्यांच्या मागे आई, आमदार पत्नी, भाऊ, दोन मुले असा बराच मोठा आप्त परिवार आहे.