
दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): भाजपा पार्टी मुस्लिमांच्या आणि अनुसूचित जातीच्या विरोधात असल्याचा अपप्रचार करून कांग्रेस पक्ष सदैव राजकारण करत आहे पण आम्ही कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही आणि करणार नाही असे प्रतिपादन आर्वी विधानसभेचे भाजपा पक्षाचे आ. दादाराव केचे यांनी आष्टी येथील टिपरीवाले देवस्थान येथे आयोजित भाजप पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षीय भाषणात आपले परखड मत व्यक्त केले यावेळी मंचावर वर्धा जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील गफाट,सुमित वानखेडे,उत्तमराव करांगळे,किशोर दिघे, कमलाकर निंभोरकर,अशोक विजयकर,मनिष ठोंबरे,सचिन होले,सुरेश नागपुरे,नीता डोईफोडे,छाया घोडिले,रेखा मतले आदी मंचावर उपस्थित होते पुढे बोलतांना आमदार केचे म्हणाले की, सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या आधारे भाजप पक्ष वाटचाल करीत असून अनुसूचित जातीसह तब्बल ७० सभागृहाचे काम केले तर मुस्लिम बांधवांसाठी ईदगाह, कब्रस्तान,आणि मदरसा करता प्राधान्यक्रम दिला आहे भाजप पक्षाची निर्मिती त्याग आणि बलिदानातून झाली असल्यामुळे कार्यकर्त्यांनी त्याचा वारसा जपून पक्ष वाढीसाठी कार्य केले पाहिजे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे स्विय सहायक सुमित वानखेडे यांचेवर बोलतांना आम्ही दोघेही एकच असून आमच्यात कोणताही दुरावा नसल्याचे स्पष्ट केले यावेळी अनेक मान्यवरांची भाषणे झालीत त्यात सुनील
गफाट, सुमित वानखेडे, उत्तमराव करांगळे,अशोक विजयकर,किशोर दिघे यांची समायोचीत भाषणे झालीत कार्यक्रमाचे संचालन ऍड मनीष ठोंबरे तर प्रास्ताविक आणि आभार कमलाकर निंभोरकर यांनी केले राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्याची उपस्थिती होती