
दैनिक चालु वार्ता छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधि :अन्वर कादरी
शिवसेनेची जिल्हाव्यापी शिवगर्जना संपर्क मोहीम
२ जून ते २५ जून सर्कल निहाय बैठकांचे आयोजन
शिवसेना जिल्हा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाव्यापी शिवगर्जना…. “आता जिंकेपर्यंत लढायच” या संपर्क मोहिमेचे २ जून ते २५ जून पर्यंत आयोजन करण्यात आले असून या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सर्कल निहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले असल्याचे विरोधी पक्ष नेते, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या संपर्क मोहिमेत पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोबतच आरोग्य केंद्रांना भेटी, वस्तीगृहांना भेटी, प्रशासकीय अधिकारी कार्यालय भेटी, त्या त्या विभागातील नागरिकांच्या भेटी घेऊन तेथील समस्यांची माहिती घेण्यात येणार आहे. बैठकांमध्ये शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, सर्व अंगीकृत सेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून संघटन मजबूत करण्याचा तसेच आता जिंकेपर्यंत लढण्याचा वज्रनिर्धार करण्यात आला असल्याचे दानवे यांनी सांगितले.
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, महिला आघाडी संपर्कप्रमुख आमदार मनीषा कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या शिवगर्जना मोहिमेत आमदार उदयसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, किशनचंद तनवाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शिवगर्जना मोहीम :-
दिनांक २ व ३ जून रोजी गंगापूर तालुक्यात, ४ जून रोजी खुलताबाद तालुक्यात, ९ व १९ जून रोजी कन्नड तालुक्यात, ११ जून रोजी पैठण तालुक्यात, १६ व १७ जून रोजी वैजापूर तालुक्यात, २३ जून रोजी फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात, २४ जून रोजी संभाजी नगर पूर्व पश्चिम ग्रामीण तालुक्यात राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेत शिवसेना (उ.बा.ठा) उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, युवा सेनेचे पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पंचायत समिती – ग्रामपंचायत – जिल्हा परिषद सदस्य यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र राठोड, किशनचंद तनवाणी, महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, राखी परदेशी, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे, मच्छिंद्र देवकर, शुभम पिवळ, कैलास जाधव यांनी केले आहे.
यावेळी पत्रकार परिषदेस जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू राठोड ,माजी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, शहरप्रमुख विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, ज्ञानेश्वर डांगे, तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड, संजय मोटे, राजू वरकड आदींची उपस्थिती होती.