
दैनिक चालु वार्ता परभाणी शहर प्रतिनिधि- शेख इसाक.
1947 रोजी सत्तेचे हस्तांतरण करताना ब्रिटिशांनी दक्षिणेतील चौल साम्राज्याचा राजदंड सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक म्हणून पंडित नेहरू यांना दिला. प्राचीन भारतामध्ये नवा राजा जेंव्हा सत्तेवर येत असे त्यावेळी त्याला राजदंड विधिवत पूजन करून देण्यात येत असे.
सर्वांप्रती समान भाव व समान न्याय याचे प्रतीक म्हणजे हा राजदंड असे. परंतु सत्ता हस्तांतरण झाल्यानंतर भारताचे सेक्युलर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी या राजदंडाचे संसदेमध्ये प्रतिष्ठापना न करता त्यास वस्तुसंग्रहालयामध्ये ठेवून भारतीय गणराज्याचे व न्याय विधानाचे प्रतीक असलेल्या राजदंडाची अवहेलना तर केलीच केली तसेच दक्षिणेतील जनतेवरही फार मोठा अन्याय केला.
नरेंद्र जी मोदी यांनी राजदंडाची प्रतिष्ठापना करून दक्षिणेतील जनतेचा सन्मान तर केलाच तसेच प्राचीन भारतीय परंपरांचा गौरवही केला त्याबद्दल आज दिनांक 30 5 2023 मंगळवार रोजी सुखसागर हनुमान मंदिरात हनुमंत रायाची आरती करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी माझ्या सह रोकड हनुमान मंडळाचे मंडळाध्यक्ष भीमरावजी वायवळ,धर्म जागरण चे बालासाहेब राजूरकर ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे व परिसरातील नागरिकांनी या आनंद उत्सवात सहभाग नोंदवला