
दैनिक चालु वार्ता परभणी शहर प्रतिनिधि-शेख इसाक.
दि.30/05/2023 परभाणी जिल्ह्यातील शासकीय अनुसूचित जातीच्या निवासी शाळेत इयत्ता सहावी ते दहावीची प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ साठी सुरू झाली आहे. त्यामुळे या शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रिक्त जागांचा तपशील व प्रवेशासंबधी अधिक माहितीसाठी शाळेचे मुख्याध्यापक, गृहपाल तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती गिता गुठ्ठे यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत सहायक आयुक्त, समाजकल्याण परभणी कार्यालयाच्या अधिनस्त परभणी जिल्ह्यात चार शासकीय निवासी शाळांमध्ये अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा हादगाव (पा.) ता. सेलू, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा अकोली ता. जिंतूर, अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा पूर्णा, ता. पूर्णा आणि अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा मानवत, ता. मानवत येथील शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व भौतिक सोयीसुविधासह सुसज्ज आहेत. या निवासी शाळांमध्ये मुलांना राहणे, जेवण व शिक्षणाची एकत्रित सुविधा उपलब्ध आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांना अद्यावत संगणककक्ष, ग्रंथालय, अनुभवी शिक्षक कर्मचारी वृंद आहे. अधिक माहितीसाठी https://www.swhostelparbhani.online या संकेतस्थळास भेट देऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निवासी शाळेत निश्चित करावा, असे अवाहन श्रीमती गुठ्ठे यांनी केले आहे.