
दैनिक चालु वार्ता परभणी शहर प्रतिनिधि- शेख इसाक
दि.31/05/2023 परभाणी जिल्हाधिकारी कार्यालयात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर, नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, शेख वसीम यांच्यासह नानासाहेब भेंडेकर, परसराम खिल्लारे आदी अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.