
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे
मंठा जिल्हाधिकारी जालना यांना मागील संदर्भाच्या अनुषंगान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देऊन दि. १ जुन २०२३ रोजी तक्रार करण्यात आली, सोळंके यांनी निवेदनात म्हटले आहे कि, दि.२९ मे २०२३ रोजी पूर्णा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून विक्री केली जात आहे म्हणून तक्रार केली होती,आज दि.३१ मे २०२३ रोजी देवठाणा येथील शेतकऱ्यांनी वाळू वाहतूक करण्यासाठी रस्ता अडवला म्हणून पंढरीनाथ तुकाराम मोरे या शेतकऱ्याला मारहाण केली, यावेळी संबंधित तलाठी नितीन चिंचोली यांनी वाळू उपसा चालू राहावा म्हणून संबंधित शेतकऱ्यांना एस.आर.पी.येणार आहे धमक्या दिल्या त्याचे व्हिडिओ शूटिंग आहे, संबंधित नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी श्री बेले, तलाठी नितीन चिंचोले यांना बडतर्फ करून पुढील कारवाई करण्यात यावी कारण वाळू माफिया शेतकऱ्यांना मारहाण करून दादागिरी करीत आहेत. तसेच वाळू माफिया दहशत निर्माण करून शेतकऱ्याला फिर्याद देऊ दिली नाही, याची मा.उपविभागीय अधिकारी परतुर यांनी देवठाणा पूर्णा नदी पात्रात जाऊन पाहणी करावी वाळू कसा प्रकार चोरी होते वाळु चोर कोण आहेत हे सुद्धा लक्षात येईलसमोर येईल म्हणून उपविभागीय अधिकारी यांना आदेश देऊन प्रत्यक्षात पाहणी करण्या बाबत मागणी करण्यात आली आहे, सेवटी निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला,योग्य ती कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पूर्णा नदी पात्राची पाहणी करण्यात येईल आमच्या सोबत काही गैरप्रकार घडल्यास याला महसूल व पोलीस प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी…