
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
कन्हैयानगर येथे शिवदूत नोंदणी अभियानाचा शुभारंभ
……………
जालना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील जनतेला व्हावा, यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे उपनेते अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत असून, शिवदूत हे प्रशासनाला सोबत घेऊन जनजागृतीसह तळागाळातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार आहे. त्याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेनेचे शहरप्रमुख विष्णू पाचफुले यांनी केले.
शहरातील कन्हैयानगर येथे आज गुरुवार दि. 1 जून रोजी शिवदूत नोंदणी अभियानाचा शुभारंभ विष्णू पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा सेनेचे जिल्हा समन्वयक शुभम टेकाळे, दीपक राठोड, सिद्धार्थ अंभोरे महादू पोळ, प्रदीप गायकवाड, मंगेश गवारे सतीश ठोले, राहुल दाभाडे, विजय खरे, सुरेन साळवे, श्रीकांत पाचरळे, दिगंबर सागळे, ज्ञानेश्वर बिडवे, विजय हजारे, रवी मस्के आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्री. पाचफुले पुढे म्हणाले की, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्हाभर राबविले जाणार आहे. जालना शहरात प्रत्येक बूथला भेटी देऊन, शिवदुत नोंदणीसह 202 बूथप्रमुखांच्या नियुक्ती केल्या जाणार आहेत. शासनाच्या विविध योजना गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत पोहचाव्यात, हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या कामी शिवदूतांच्या नेमणुकीचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवदूत आणि शासन यांच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवल्या जाणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या अनेक योजनांची माहितीदेखील नसते. अश्या नागरिकांना या अभियाना अंतर्गत शासकीय योजनांचा लाभू शकेल. तळागाळातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी किंवा अर्जासाठी इतर कागदपत्रे आणि दाखले मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे घालावे लागायचे. या सर्व गोष्टीतून नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सरकारतर्फे ‘शासन आपल्या दारी ‘ हा उपक्रम राबविला जात आहे. या अभियानाअंतर्गत नागरिकांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत आहे आणि त्यासाठी आवश्यक विविध कागदपत्रांची पूर्तता देखील करून दिली जात आहे. या अभियाना अंतर्गत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा मोठ्या संख्येने जनतेला लाभ व्हावा, यासाठी अर्जुनराव खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपणही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही विष्णू पाचफुले यांनी यावेळी बोलताना दिली.