
दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / शिराढोण :- अतिशय दानशूर ,कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहील आहे ते लोककल्यानी,प्रवाहित दक्ष ,राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९८ वी जयंती मोठ्या उत्साहात ग्रामपंचायत कार्यालय शिराढोण ता.कंधार येथे साजरी करण्यात आली.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार ग्रामपंचायत सरपंच श्री खुशालराव पाटील पांडागळे व सदस्य यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत मार्फत सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मान्याबाई भिमराव जमदाडे व कौशल्याबाई पांडुरंग गायकवाड यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देवून व शाल पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.त्यानंतर शासनाच्या वतीने हर घर नर्सरी ही योजना राज्य भर राबविण्यात येत आहे या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालयामार्फत अंगणवाडी सेविका,मदतनिस यांना नर्सरी रोपवाटिका तयार करण्यासाठी पन्नास रोपवाटिका तयार करण्यासाठी पिशविचे वाटप करण्यात आले .यावेळी ग्रामपंचायत शिराढोण येथील सरपंच श्री खुशालराव पाटील पांडागळे,उपसरपंच पांडुरंग पवार, ग्रामसेवक श्री जी.टी.टोकले,श्री मुंजाळ,तंटामुक्ती अध्यक्ष सदाशिव अप्पा देवणे,जयराम पाटील पांडागळे,सामाजिक कार्यकर्ते मनोज जमदाडे,ग्रामपंचायत सदस्य मान्याबाई जमदाडे,सदानंद भुरे,शिवाजी गायकवाड, सदस्य प्रतिनिधी प्रकाश चौडम, खमरुद्दीन शेख, से.स.सोसायटीचे सदस्य ईश्वर पाटील पांडागळे,साईनाथ केत्ते( शिक्षक),दादाराव पाटील कपाळे,माधवराव पाटील कपाळे,सुनील पांडागळे,गजानन पांडागळे,जावेद शेख, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावरी मंडळी उपस्थित होते.