
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
देगलूर तालुक्यातील सुंडगी येथें
आज दिनांक 31 मे 2023 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आज ग्रामपंचायत सुंडगी तालुका देगलूर जिल्हा नांदेड च्या वतीने दोन कर्तृत्ववान महिलांचा प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये सौ. पल्लवी लालू कांबळे, सौ. सत्यभामा भीमराव दिपके, या कार्यक्रमाच्या वेळेस गावचे उपसरपंच दिलीप रामराव पाटील माजी सरपंच लालू हरिबा कांबळे पत्रकार भीमराव दिपके ,जीवन बरसमवार, राजू कांबळे , मारोती सुंभाळे
ग्रामसेवक सौ तेलंग मॅडम, अंगणवाडी सेविका मुद्रिका ताई मदतनीस लक्ष्मीबाई बोईनवाड, सौ राजश्री दिपके, यावेळी गावातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते