
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
हिमायतनगर तालुक्यातील वरंग टाकळी येथे दिनांक 31 मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय व जयंती मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली .यावेळी सरपंच मायाबाई दयाळगिर गिरी एस आर शिंदे साहेब विस्तार अधिकारी पंचायत समिती हिमायतनगर व ग्रामसेवक काळे साहेब, पोलीस पाटील अवधूत कदम यांनी अहिल्यादेवी प्रतिमेला अभिवादन करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या आदेशावरून जयंतीच्या दिवशी. गावातील सामाजिक राजकीय शैक्षणिक किंवा इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन महिलांची निवड करून त्यांचा सन्मान करण्याचे आदेश ग्रामपंचायत ला दिले आहेत. त्यावरून सेवा सहायता महिला समूह गटाच्या सी.आर.पी सौ. ज्योती चौरे व सामाजिक कार्यकर्त्या कमलबाई मारुती हाके या दोन महिलांची पुरस्कारासाठी निवड करून त्यांचा ग्रामपंचायत च्या सरपंच सौ. मायाबाई दयाळगीर गिरी व विस्तार अधिकारी शिंदे साहेब व ग्रामसेवक काळे साहेब यांच्या हस्ते शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गावातील आबारावजी पाटील जोगदंड, पांडू आडे, तंटामुक्ती अध्यक्ष पोलीस पाटील अवधूत कदम, पत्रकार दत्ता पउपलवाड , पत्रकार राम चिंतलवाड ,कृष्णा आंबेपवाड कोंडबाराव पाटील विलास हाके शेषराव राणे सिद्धार्थ हनवते , सुंदर सिंग राठोड, संभाजी चिंतलवाड ,दत्ता आंबेपवाड, चंद्रभान कानोटे, विशंभर कानोटे, गजू बाच्कलवाड, आनंदा रुद्रबोईवाड , कोंडबा कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. व इयत्ता बारावी मध्ये 80 टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अत्रिनंदन साहेबराव हाके, मनीषा अर्जुन आडे यांचा पण सत्कार करण्यात आला आणि सरकार आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गावातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेची माहिती आपलेच भूमिपुत्र विस्तार अधिकारी पंचायत समिती यांनी माहिती दिली यावेळी चापाची विलास हाके, सावन हाके, दयानंद हाके, वामन गिरी, सुरेश टोकलवाड, यांनी परिश्रम घेतली यावेळी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस आशा वर्कर व गावातील सर्व समाजाच्या महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते….