
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई — महामानवाच्या संयुक्त जयंतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मंत्रालय येथे शिव -फुले-आंबेडकर यांच्या संयुक्त जंयतीच्या जयंती निमित्त केले.
मुंबई येथे मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागणांत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जंयतीचीचे आयोजन आयोजन अनु जाती/जमाती/विजा-भज/इमाव/विमाप्र / शासकीय- निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
: छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवांनी महाराष्ट्र घडविला. त्यांनी महाराष्ट्रासह देशाला दिशा दिली. अशा महामानवांच्या जयंतीचा संयुक्त उपक्रम कौतुकास्पद आहे, असे उद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.
अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे छ्त्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती सोहळा दि.३० मे रोजी दुपारी मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार भरत गोगावले, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, संघटनेचे अध्यक्ष भारत वानखेडे, उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत ढोके, संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष गवई उपाध्यक्ष विजय नांदेकर उपाध्यक्ष भास्कर बनसोडे महासचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे ,मुंबई प्रदेशाध्यक्ष सुबोध भारत, किशोरी इंगळे ,राज सराफ, रामदास प्रदीप ननावरे दिलीप शेळके, भारतीय आवानखेडे , राजेंद्र धावारे ,सविता शिंदे, प्रिया रामटेकर, जलसंपदा विभागाचे प्रदेशाध्यक्ष बी.बी. गायसमुद्रे, नितीन वाकळे, प्रसिध्दी प्रमुख विलास सावळे, छायाचित्रकार विनोद महाबळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच यावेळी
रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा,माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आमदार भरत गोगावले, आमदार संतोष बांगर, माजी आमदार शिरीष चौधरी आदींनी या सोहळ्यास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. अशाच प्रकारचा हा उपक्रम आहे. संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले की, अनु. जाती/जमाती/विजा – भज/ इमाव/विमाप्र शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी संघटनेतर्फे दरवर्षी प्रबोधनपर उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे नेहमीच सहकार्य राहिले आहे. यावेळी व्याख्याते रवींद्र शिवाजी केसकर यांनी ‘माणसाची एकच जात, दोन पाय- दोन हात’ याविषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर संगीतकार जॉली मोरे, शाहीर सीमा पाटील यांनी ‘भारतीय संविधानाची गौरवगाथा’ या विषयावर प्रबोधनपर गीते सादर केली.
संघटनेतर्फे देण्यात येणारा सन २०२३ चा डॉ. बी. आर. आंबेडकर राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पाच हजार ५१ रुपये रोख, सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिव-फुले-आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.