
दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी -माणिक सुर्यवंशी.
देगलूर येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन मेमोरियल ट्रस्ट देगलुर ची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२ जुन रोज शुक्रवारी संस्थेचे अध्यक्ष श्री.चोंडीकर जी.व्ही. यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दरम्यान जवळपास ३० वर्षापूर्वी कै.इरवंतराव पाटील नरंगलकर व कै.दोंतुलवार सर यांच्या प्रयत्नाने शिक्षक सदन म्हणून या ट्रस्टची निर्मिती करण्यात आली होती. कार्यालयीन कामकाज व दवाखाना अशा कामासाठी तालुकास्तरावर आल्यावर खेड्यातील शिक्षकांना तालुकास्तरावर राहण्यासाठी सोय नव्हती.त्यासाठी त्यांना राहण्यासाठी म्हणून सदरील सदन ची निर्मिती झाली.पण कालांतराने वाहतुकीची सोय झाल्यामुळे शिक्षकांना राहण्याची गरज भासत नसल्यामुळे ट्रस्टच्या इमारतीचा वापर शिक्षकांच्या पाल्यांना उद्योगासाठी म्हणून सात दुकाने काढून अल्पदरात भाड्याने देऊन त्यांना त्यांच्या उन्नतीसाठी ही दुकाने देण्याचे ठरले.तसेच यापुढे आणखी नवीन उपक्रम राबवून शिक्षकांच्या हिताचे उपक्रम आयोजित केले जातील असे संस्थेचे अध्यक्ष श्री.चोंडीकर यांनी सांगितले .संस्थेच्या दोन रिक्त पदावर विश्वस्त म्हणून नांदेड जिल्हा परीषदेचे शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य श्री.बस्वराज जगन्नाथराव पाटील वन्नालीकर व श्री.चंद्रकांत तम्मलवार सर यांची विश्वस्त पदी निवड झाल्यामुळे त्यांचे सभागृहात सत्कार करण्यात आले. सोबतच संस्थेचे अध्यक्ष श्री.चोंडीकर जी.व्ही , सचिव श्री.शिंदे एस.आर या दोघांचे पण सत्कार करण्यात आले.
तसेच याप्रसंगी ट्रस्टचे कोणतेही काम अत्यंत स्फूर्तीने पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत श्री.बस्वराज पाटील वन्नाळीकर यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव शिंदे एस.आर. सर,मठदेवरू सर,बावगे सर, चामावार सर,अल्लापुरे सर,देशमुख सर, हिंगोले सर,बिरादार सर,तम्मलवार सर व बस्वराज पाटील वन्नाळीकर इत्यादी विश्वस्त उपस्थित होते.