
दैनिक चालु वार्ता किनवट प्रतिनिधी दशरथ आंबेकर:-
येत्या दि.०६जून रोजी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांची रिपब्लिकन मंच यांच्या वतीने रामलीला मैदान रयतु बाजारच्या बाजूला सकाळी ११:०० वाजता जाहीर सभेचे आयोजन केले आहे.या सभेच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे किनवट तालुका अध्यक्ष राजेंद्र शेळके व सर्व तालुका पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुक्यातील सर्वंच गावातील समाज बांधवाशी संवाद साधुन व प्रत्यक्ष भेटुन आयु.बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्यासाठी तेलंगणा राज्यातीलआदिलाबाद येथिल जाहीर सभेसाठी वंचित बहुजनआघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्ते तसेच एससी,एसटी,ओबीसी,भटके विमुक्त जमाती बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे,आवाहन संतोष शेरे वंचित बहुजन आघाडी तालुका सचिव यांच्या वतीने करण्यात आलेआहे.