
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी बीड अंबाजोगाई
ऐश्वर्य संपन्न संत श्री भगवान बाबा जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक यांनी अंबाजोगाई संत श्री भगवान बाबा चौक शेपवाडी परीसर येथे अंबा नगरीत येणाऱ्या रविवार दिनांक १८ रोजी पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या पंढरपूर येथे आषाढी वारी निमित्त जाणाऱ्या सर्व वारकरी दिंड्यांना संत श्री भगवान बाबा उत्सव समितीच्या वतीने थंडपेय, रसना व औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले हा उपक्रम सकाळी अकराच्या दरम्यान चालू होऊन रात्री सात पर्यंत उपक्रम चालू च होता , या दिवशी संत श्री नामदेव महाराज दिंडी ,संत जनाबाई दिंडी व अनेक दिंड्या आंबेजोगाई मार्गे पंढरपूरला जात होत्या त्या सर्व दिंड्यांची सेवा भगवान बाबा जयंती उत्सव समितीच्या सर्व स्वयंसेवक समितीने केली.
यात आयुर्वेद स्वतः गोशाळेतून तयार केलेले बाम मालिश चे तेल या मार्फत ॲड. श्री अशोक मुंडे यांनी वारकऱ्यांची हातपाय मालीश करून सेवा केली केली, तसेच गणेश शेप ,दत्ता फड,सचिन कांदे,अमृत कराड यांनी मेडिसिन विभाग सांभाळून सर्व वारकरी बांधवांना योग्य त्या गोळ्या औषधे दिली.
येणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना विरंगुळा म्हणून संगीत नियोजन श्री सुशांत शेप यांनी लावले, संगीताचा आनंद सर्व वारकरी बांधव घेताना दिसले,
कार्यक्रमाचे सर्व नियोजन आयोजन श्री नामदेव शेप, व त्यांच्या सर्व आप्तेष्ट स्वयंसेवकांनी केले .
दिंडी आगमनाच्या वेळी अंबाजोगाईतील व पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्त जण उपस्थित होते. ज्येष्ठ नेते मार्गदर्शक श्री नंदकिशोर काकाजी मुंदडा, दिलीप दादा सांगळे, युवा नेते राजेभाऊ शेप ,अजित भैय्या सांगळे, संजयजी गंभीरे, राहुल जी कराड ,माऊली शेप व ईतर मान्यवर उपस्थित होते.
*अंबाजोगाईतील पोलीस बांधवांचे लाभले विशेष सहकार्य* ठाणेदार श्री घोळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कुठेही वाहतूक अडथळा अथवा अनुचित प्रकार न घडू देण्यासाठी सर्व वाहतूक नियंत्रण व चोख बंदोबस्त तयारी केलेली दिसून आली..