
प्रतिनिधी: हेमंत खंडाळे
डिप्लोमा इंजीनियरिंग महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या पदविका अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाकडून तसेच डी. टी. इ. बोर्डाकडून प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. याची घोषणा नुकतीच या प्रवेशासाठी बनविण्यात आलेल्या संकेतस्थळावर करण्यात आली. कोरोना कालावधीपासूनच एकूणच संपूर्ण राज्यामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा अधिकाधिक कल दिसत आहे. याचाच परिणाम म्हणून मागच्या शैक्षणिक वर्षामध्ये म्हणजेच सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षांमध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग चे प्रवेश 85% पर्यंत झाले होते. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचा ओढा तांत्रिक शिक्षण घेण्याकडे आहे, कारण डिप्लोमा इंजीनियरिंग हा इयत्ता दहावी नंतर उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी अधिक सक्षम आणि विद्यार्थ्याला रोजगारक्षम बनवणारा अभ्यास क्रम आहे. विद्यार्थ्यांचा या अभ्यासक्रमाकडे असणारा ओढा लक्षात घेऊन अधिकाधिक विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता यावा तसेच केवळ मूळ कागदपत्रां अभावी विद्यार्थ्यांच्या प्रवेशांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून सदर निर्णय घेऊन प्रवेश घेण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या प्रवेशासाठी ही एक सुवर्णसंधी यानिमित्ताने ज्यांचे अर्ज निश्चित करायचे राहिलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना मिळालेली आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन, विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश अर्ज सुविधा केंद्रावर किंवा ऑनलाईन ई-स्कृटिनी पद्धतीने निश्चित करून घ्यावा. असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले…