
दै.चालु वार्ता,
उपसंपादक पुणे जिल्हा,
शाम पुणेकर
पुणे : काल २० जून रोजी तळजाई परिसरातील वनशिव झोपडपट्टी परिसरात तब्बल ३० गाड्या फोडल्या आहे. सुमारे ५-६ जणांनी तोंडाला रुमाल बांधून ही वाहने फोडली आहे. त्यामुळे या गाड्या रुमाल गँगनं फोडल्या असल्याचं बोललं जात आहे. या वाहनांमध्ये ऑटो रिक्षा, टेम्पो, कार इत्यादी वाहनांचा समावेश आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी हा धक्कादायक प्रकार घडल्याचं दिसून आलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
दरम्यान, काल वारजे परिसरात कोयता गँगचीही दहशत दिसून आली. वारजे परिसरातील कॅनल रोडवर या गँगने काही गाड्यांच्या काचा फोडल्या आहे. वारजे येथील रामनगर कॅनल रोडवर नागेश्वर मंदिराजवळ काल सकाळी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.
त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दहशतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची काल भेट घेतली आणि सविस्तर चर्चा केली.
पोलीस खाते तत्परतेने आपले कर्तव्य बजावत असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
– पुणे न्यूज