
राजगुरूनगर:- जत येथील प्रांत अधिकारी श्री. जोगेंद्र कट्यारे यांची खेड पुणे राजगुरूनगर या ठिकाणी प्रांतअधिकारी मनून बदली झाली आहे. सोमवारी उशिरा या बाबतचा शासन आदेश निघाला आहे. कट्यारे यांनी पाऊणे दोन वर्ष झीरो पेंडेन्सी ही संकल्पना जत मध्ये प्रभाविपने राबविली होती. तसेच जत मधील महसूल विभागात सुसूत्रता निर्माण केली होती. जोगेंद्र कट्यारे यांनी आज दुपारी आपल्या पदाचा पदभार सांभाळला आहे. प्रांत कट्यारे यांना खेड तालुक्यातील अनेक पुनर्वसनाच्या प्रश्न, रिंग रोड, सेमी हायस्पीड रेल्वे, चाकण औद्योगिकरणाचा पाचवा टप्पा भुसंपादन, धरण ग्रस्थ असे अनेक प्रश्नांचा सामना करावा लागणार आहे.
छाया :- मयुरी वाघमारे
दै.चालु वार्ता, राजगुरूनगर प्रतिनिधी.