
दैनिक चालू वार्ता किनवट
प्रतिनिधी दशरथ आंबेकर
नांदेड– किनवट तालुक्यातल्या शिवणी गावाच्या परिसरात १० ते १५ जणांच्या टोळक्याच्या हल्ल्यात १ तरुण ठार तर ६ जण जखमी झाल्याची घटना घडली. हा तरुण गोरक्षक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. शिवणी, चिखली गावातील ७ युवक तेलंगाणात नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते. ते परत येत असताना शिवणी गावाजवळील पुलावर एक बोलेरो पिकअप गाडी दिसली. त्यांनी अधिक चौकशी कली असताना बोलेरोतील टोळक्यांनी अचानक आहे. सशस्त्र हत्यारे घेऊन या युवकांवर हल्ला चढवला. यात शंकर रापेली या युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जखमी झाले आहेत.
त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत. आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी सांगत शासकीय रुग्णालयासमोर रास्ता रोको केला
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अप्पारावपेट परिसरात १० ते १२
लोकांनी मिळून ७ गोरक्षक कार्यकर्त्यांवर प्राणघातक धारदार शस्त्राने हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती, इतर ६ जण गोरक्षक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या हल्ल्यात इतर ६ जण जखमी झाले आहेत. जखमींवर नांदेडच्या सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.