
दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी.
आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी शारीरिक व मानसिक संतुलन चांगले ठेवणे गरजेचे आहे आणि यासाठी योग साधनेची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ.शिवकर्तिक स्वामी यांनी केले.ते येथील मानव्य विकास विद्यालयात एनसीसी विभागाकडून योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
आज योगा दिनानिमित्त मानव्य विकास विद्यालयातील प्रांगणात आयोजित कार्यक्रमात डॉ. शिवकार्तीक स्वामी यांनी विद्यार्थ्यांना सूक्ष्म व्यायामाचे धडे देऊन त्याचे महत्त्व सांगितले.
तसेच अष्टांग योगातील यम,नियम,आसन, प्राणायम, प्रत्याहार, ध्यान,धारणा व समाधी यांची विस्तृत माहिती दिली.
यानंतर योग शिक्षक कृष्णा पाटील यांनी सर्व प्रकारची योगासने करून दाखविली.
सदरील कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक संतोष कोल्हे,पर्यवेक्षक शरद हांद्रे,श्याम कोल्हे,एनसिसी विभाग प्रमुख गिरीश पारसेवार,शिक्षक प्रतिनिधि संजय कल्याणी यांच्यासह एनसीसी कॅडेट मोठ्या संख्येने उपस्थित होते.