
ग्रामपंचायत चे आभार
दैनिक चालू वार्ता
बल्लारपूर प्रतिनिधी कमलेश नेवारे
विसापूर: श्री संदीप श्रीहरी पोडे (भाजापा यु. मो. जिल्हा उपाध्यक्ष ) यांनी नागरिकांचा मागणी प्रमाणे विसापूर वॉर्ड क्र.5 ते तालुका क्रीडा संकुल कडे जाणाऱ्या रस्त्यावर आलेल्या काटेरी झाडें तोडून रस्ता सफाई करून देण्याचे करावे जाणेकरून जंगली जाणवरंचा धोका सुद्धा टळेल या प्रकारची मागणी विसापूर ग्रामपंचायत कडे विडिओ मार्फत ऑनलाईन मागणी केली होती. त्या नंतर सरपंच ताईंनीं माहिती दिली कि काही अर्जंट नाली सफाई काम सुरु आहे ते झाल्याबरोबर तुमची मागणी पूर्ण करून देऊ असे आश्वासन दिलेलं होते आणि बोलल्या प्रमाणे करून दिले. थोडं काम राहाल आहे ते सुद्धा पूर्ण होऊन जाईल अशी माहिती दिलेली आहे त्या मद्दल विसापूर ग्रामपंचायत चा सरपंच ताई व विसापूर ग्रामपंचायत चे विसापूर भाजपा यु. मो. ग्रुप तर्फे मनःपूर्वक आभार मानले..