
धनाजी जोशी शिवसेना शहर सचिव देगलूर
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील नागरिकांना लवकरात लवकर ६०० रुपये ला ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी यासाठी विरोधी पक्षनेते दानवे यांना देगलूर शहराचे सचिव धनाजी जोशी यांनी दिले निवेदन.शासकीय डेपोतून नागरिकांना वाळू मिळणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले; मात्र अद्यापपर्यंत वाळूची प्रक्रिया चालू झाली नाही. या मुळे अल्प दरात वाळू कधी मिळणार याची उत्सुकता देगलूर तालुक्यातील नागरिक वर्गात पसरली आहे. सध्याला देगलूर शहरांमध्ये रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर टिप्पर मधून रात्रीच्या वेळी अवैधरीत्या वाळू सरास चालू असून गोरगरीब नागरिकांना ५००० ते ६००० रुपये ब्रास वाळूचे पैसे मोजावे लागत आहेत.
महाराष्ट्र सरकारने दि. १ मे महाराष्ट्र दिनापासून ६०० रुपये ब्रास वाळू विक्री करण्याचानिर्णय घेतला आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी अवैध मार्गाने किंवा वाळू माफियाकडून वाळू खरेदी न झाल्यानंतर कळेल.. करता राज्य सरकारकडून ६०० रुपये ब्रास प्रमाणे आपणाला शासनाच्या डेपोतून वाळू मिळणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मुळे या भागातील नागरिक वर्गात उत्सुकता पसरली आहे. सहा हजार रुपये ब्रास मिळणारी सुद्धा चालू वाळू ६०० रुपये ब्रास मिळणार असल्याने हजारो नागरिक वाळूखरेदीसाठी सज्ज झाले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अवैध मार्गाने वाळूची तस्करी करून चढ्या भावाने वाळू विक्री चालूच आहे. या वर आळा बसेल या उद्देशाने राज्य सरकार हा निर्णय घेतला असला तरी कितपत ही योजना नागरिकांसाठी उपयोगी ठरेल हे वाळू डेपो चालू झाल्यानंतर कळेल.. त्याआधी शासनाने लवकरात लवकर देगलूर तालुक्यातील नागरिकांसाठी सहाशे रुपयात वाळू उपलब्ध करून द्यावी असे निवेदन धनाजी जोशी शिवसेना उद्धव ठाकरे गट शहर सचिव देगलूर यांनी दिले.