
पुणे शिरूर :- आदरणीय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या सेवा, सुशासन व गरीब कल्याणच्या संकल्पनेला 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत या प्राश्वभूमीवर देशात ” मोदी @9 ” हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानात अंतर्गत टिफिन बैठक शिरूर लोकसभा निवडणूक प्रमुख मा. आमदार महेशदादा लांडगे तसेच भाजपचा जिल्हा नियोजन समितीपुणे जिल्हा सदस्य, पुणे जिल्हा विधानसभा प्रमुख सौ. आशाताई बुचके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी सर्व प्रमुख पदाधिकारी व महिला पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छाया :- मयुरी वाघमारे.
दै, चालु वार्ता, राजगुरूनगर प्रतिनिधी..