
दै.चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव नवनाथ यादव
भूम:- धाराशिव येथील स्वयमशिक्षण प्रयोग आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांच्या संयुक्त विद्यमानाने माणकेश्वर येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपात महिला शेतकऱ्यांसाठीचे सेंद्रिय शेतीचे एक दिवसीय प्रशिक्षण पार पडले.यावेळी महिलांना खरीप हंगामातील पेरणीपूर्व बियाणांची उगवण क्षमता कशी करायची याचे मार्गदर्शन देण्यात आले.प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आले असून शेतीच्या मालाचा बाजारपेठ आणि बाजारभाव याची माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती यावेळी देण्यात आली.यावेळी श्री ओंकार ,सुशांत शिरसागर ,अपर्णा हु़ंबे यांनी उमार्गदर्शन केले. यावेळी माया ईजगज,शुभांगी गुंजाळ,जनाबाई वाघमारे, रेखा पालखे शेतकरी महिला उपस्थित होत्या.