
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी
राष्ट्रीय प्रशिक्षक डॉ. संतोष कदम
मानवलोक समाजकार्य महाविद्यालय अंबाजोगाई येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कार्यक्रमात अंबाजोगाई येथील राष्ट्रीय प्रशिक्षक प्रसिद्ध शिक्षक डॉ. संतोष कदम यांनी उपस्थित यांना आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
योग दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात त्यांनी उपस्थित त्यांना योग आणि प्राणायामाचे धडे दिले तसेच योगाद्वारे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळवता येते याची अनेक उदाहरणे सांगून योगाचे महत्त्व पटवून दिले.
डॉ. नजीर शेख, डॉ. हनुमंत साळुंखे, डॉ. किसन शिनगारे , अशोक केदार, श्यामसुंदर सरवदे, अण्णा शेंडे, सुहास माळी, निरंजन जोगी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
नियमितपणे योग प्राणायाम करून अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक आजारापासून मुक्तता होते आणि आनंदी जीवन जगता येते असा विश्वास डॉ. संतोष कदम यांनी व्यक्त केला..