
देगलूर: देगलूर तालुक्यात मागच्या काही दिवसापासून तेलंगाना राज्यातून चोरट्या मार्गाने नागराळ घुळा तांडा व चेंडेगाव माळेगाव या तेलंगाना सीमा वरती मार्गे तेलंगाना राज्यातील बिरकुर येथील अवैध्य वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात देगलूर व देगलूर परिसरामध्ये होत असून हे वाळू माफिया देगलूर तालुक्यातील नागरिकांना अवाच्या सव्वा दरामध्ये वाळू विक्री करीत असताना दिसत आहे . महाराष्ट्र शासनाने ६०० रुपये ब्रास घरपोच नागरिकांना वाळू मिळणार असे वाजागाजा केला परंतु अजून ६०० रुपयांमध्ये एक ब्रास वाळू कागदोपत्रीच असून याचा फायदा तेलंगाना राज्यातील वाळू माफिया घेत असून त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत आहे. यावर आळा घालण्यासाठी
नागराळ घुळा तांडा व चेंडेगाव तसेच माळेगाव या चौकामध्ये अवैध्य वाळू वाहतूक विरोधी पथक नेमून शासनाचा महसूला मध्ये वाढ करावी अन्यथा
महसूल विरोधी पथक दोन दिवसाच्या आत नेमण्यात न आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूर च्या वतीने मनसे स्टाईल मध्ये आंदोलन करण्यात येईल यात अनुचित प्रकार घडला तर सर्वस्व जबाबदार प्रशासन राहील असे निवेदन उपजिल्हा अधिकारी देगलूर व तहसीलदार देगलूर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना देगलूरच्या वतीने देण्यात आले त्यावेळी
करण ऊरमुंगे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष देगलूर
विजय देशमुख तालुका संघटक मनसे देगलूर
चंदू आवयमवार शहर अध्यक्ष मनसे देगलूर
नामदेव बिटु गिरे शाखा अध्यक्ष देगलूर आधी पदाधिकारी उपस्थित होते…