दैनिक चालु वार्ता, मंठा प्रतिनिधी
प्रविण कुलकर्णी
मंठा येथिल गणेश मंगल कार्यालयात गुरुवार ( ता.२२) रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी शिवसेना तालुकाप्रमुख (शिंदे गट) उदय बोराडे गणेशराव शहाणे आर. के. राठोड, शिवाजी जाधव, संतोष शहाणे, अच्युतराव सराफ, हभप संतोष महाराज निर्वल आदींची प्रमुख उपस्थिती होती. सुरवातीला तुळशीला पाणी घालुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी भारतीय सीमा सुरक्षा दलात निवड झाल्याबद्द्ल केशव गोरे या तरुणाचा सत्कार करण्यात आला या वेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना पो. नि . संजय देशमुख पुढे म्हणाले की, केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर घडणे असे समजण्याचे कारण नाही किती तरी क्षेत्रात विद्यार्थी स्वतःचे सामर्थ्य सिध्द करू शकतात, परंतु आपण त्या कडे लक्ष देत नाही. एका गुणामुळे किमान ७५ हजार विद्यार्थ्यांचा एमबीबीएस चा प्रवेश हुकतो इतकी जीवघेणी स्पर्धा आहे. जीवघेण्या स्पर्धेमुळे अनेकदा विद्यार्थांना नैराश्य येते. यातुन विद्यार्थी स्वतःचे जीवन संपवण्याच्या घटना देखील घडताना दिसतात. केवळ मार्गाची सुज म्हणजे गुणवत्ता नसते, तर स्वतःमधील कौशल्य विकसित करून आपल्या जाणिवा अधिक प्रगल्भ करणारे शिक्षण मिळणे गरजेचे आहे असे प्रा. देशमुख यांनी शेवटी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक वैभव शहाणे यांनी आपल्या प्रास्ताविकातून आजपर्यंत केलेल्या विविध समाजउपयोगी कार्याचा आढावा घेतला. सूत्र संचलन सतिश पाटील खरात यांनी केले तर आभार गणेशराव शहाणे यांनी मानले. यावेळी अशोकराव वायाल, पप्पु दायमा, प्रा. अच्युत मगर शेषनारायण दवणे , डॉ. दत्तात्रय काकडे, संजय गायकवाड, बंडूनाना मोरे यांच्यासह शिक्षक व्यापारी ,पत्रकार, विद्यार्थी, पालकांची मोठी उपस्थित होती…


