दैनिक चालु वार्ता
पुणे शहर प्रतिनिधी विशाल खुणे .
दि .22 जून खांडवी (बार्शी )
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातील खांडवी ग्रामपंचायत सदस्य आणि मानवीहक्क कार्यकर्ता आकाश दळवी त्याचे मित्र राम चोरघडे आणि प्रवीण भोसले याच्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला झाला आहे.
आकाश दळवी याना बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून त्याला दोन्ही हाताला आणि दोन्ही पायाला प्रचंड मारहाण झाली असून फ्रॅक्चर झालेले आहे. राम चोरघडे आणि प्रवीण भोसले यांना सुद्धा बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले असून फ्रॅक्चर झाले असून त्यांच्यावर सुद्धा उपचार चालू आहेत.
दळवी यांनी दि. १९ खांडवी ते कव्हेकडे जाणाऱ्या पात्रामध्ये वाळूचे उत्खनन सुरु आहे असा संदेश भ्रमणध्वनीवरून प्रसारित केला व एका जेसीबी मशिनच्याव्दारे वाळू उपसा भरून नेण्याचे काम चालू असताना दळवी तेथे आल्यानंतर सदर ट्रॅक्टर चालक व जेसीबी चालक यांनी वाहनांसह पळ काढला. सदर उत्खनन संबंधित व्यक्तीला विचारणा केल्यावर त्याच्यावर हल्ला झाल्याने ते जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले आहे.
गावाजवळच्या ढोर ओढयाच्या पात्रातील अवैध वाळूचे उत्खनन करण्यास विरोध केल्यामुळे अज्ञात इसमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. याबाबत बार्शी तालुका पोलीस स्टेशनने या घटनेची नोंद घेतली असली तरी सदर प्रकरणातील जखमी दळवी हे बेशुद्ध अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा जबाब नोंदवला गेला नव्हता . मात्र शुद्धीवर आल्यावर याबाबत रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे. मात्र अजून आरोपींना अटक झालेली नाही. दरम्यान महसूल प्रशासन या सर्व प्रकरणावरून चिडीचूप्प आहे. त्यांनी या घटनेची अद्याप कुठलीही दखल घेतली नाही. यापूर्वी त्यांनी अवैध धंद्याबाबत आवाज उठविला आहे.
बार्शी तालुक्यातील खांडवी येथील घटना ग्रामपंचायत सदस्य आणि मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे तालुका अध्यक्ष आकाश दळवी यांनी चार दिवसांपूर्वी बार्शीचे तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना बार्शी तालुक्यातील शहर व पांगरी तसेच वैराग येथील पोलीस स्टेशनमध्ये गेल्या तीन वर्षात खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रमाण वाढले असून या प्रकारांना आळा घालण्याबाबत निवेदन दिले होते.
यावेळी पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आण्णा जोगदंड म्हणाले कि आकाश दळवीच्या निवेदनाची पोलीस, तहसीलदार, यांनी घेतली नाही यामुळेच हा हल्ला झाला हल्लेखोरा ईतकेच प्रशासन ही जबाबदार आहे त्यांनी ही आपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळेच भ्याड हल्ला झाला असे तहसीलदार अर्चना निकम यांना दिलेल्या निवेदनात जोगदंड यांनी म्हटले आहे.
यावेळी संस्थाअध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले कि आमच्या संस्थेचे पदाधिकारी तालुका पातळीवर व जिल्हा पातळीवर तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी करतील वेळप्रसंगी वाळूमाफीयाच्या विरोधात राज्यभर आंदोलने केले जातील असा इशारा ही प्रशासनाला दिला आहे.
यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महीला अध्यक्षा मीना करंजवणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगिता जोगदंड, कार्याध्यक्ष गजानन धाराशिकर सामाजिक कार्यकर्ते .राहूल शेडगे यांच्या सहया आहेत.
मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे ,मा.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते मा.अजित पवार याना ही निवेदन दिले आहे.
त्या मध्ये ग्रामपंचायत सदस्यावर आणि मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे तालुका अध्यक्षावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना ताबडतोब अटक करा –
आकाश दळवी यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत.ते तातडीने मागे घ्या – असे म्हणत आहेत
फोटोवळः मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीच्या वतीने शहराध्यक्ष आण्णा जोगदंड आणि सा.मा.कार्यकर्ते राहुल शेंडगे तहसीलदार अर्चना निकम यांना निवेदन देतांना.


