
प्रतिनिधी मंठा सुरेश ज्ञा. दवणे
मंठा शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे ९ वां आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला यावेळी योग प्रशिक्षक मोरेश्वर बोराडे व ज्ञानेश्वर नेवरे यांनी योगासन ,ध्यान व प्राणायाम यांचे महत्त्व सांगून मार्गदर्शन केले.
या योग सत्राला वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर आर गायके, डॉ.पी डी बोराडे, डॉ. बी जी काळे, डॉ. प्रविन हांडगे, डॉ.प्रसाद काळे ,डॉ. बी. चिंचने, डॉ. चाटसे, डॉ. संदीप घुगे, एन.सी.डी प्रमुख वाढवे ,आरोग्य सहायक आनंद वाघमारे, विलास देशमुख तसेच ग्रामीण रुग्णालय मंठा येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आणि आर्ट ऑफ लिविंग चे रामेश्वर शिंदे, सुरेश वायाळ यांनी सहभाग नोंदवला.