मुंबई : होऊन १५ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने मुंबईकर उकाड्यामुळे हैराण झाले आहेत. चक्रीवादळामुळे मान्सूनची चाल यंदा थोडीशी मंदावली आहे.
परंतु सर्वात दिलासादायक गोष्ट म्हणजे उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरूवात होणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
२३ ते २९ जूनदरम्यान मध्य भारतात चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच ३० जून ते ६ जुलैदरम्यान मान्सून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सक्रिय राहील, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. नाशिक जिल्हयाला हवामान विभागाने यलो अर्लट जारी केला आहे. घाट प्रदेशातील काही गावांमध्ये येत्या २६ जून रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.बिपरजॉय वादळाचा तडाखा यामुळे पाऊस लांबला असतांना अल निनोमुळे मान्सून लांबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आता जिल्हयात पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. अर्थात गेल्या महिनाभरापासूनच नाशिक जिल्हयातील ग्रामीण भागात पंधरा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारया गंगापुर धरण समुहात २१ टक्के तर गंगापुर धरणात ३१ टक्के पाणीसाठा आहे.


