
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:दि. 25 जून 2023 रोजी देगलुर येथील युनीक अकॅडमी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व पालक मेळावा थाटात संपन्न झाला . सोहळ्याची सुरूवात डॉ. सुनील जाधव यांनी प्रार्थना गीत गायन करत दिप प्रज्वलन , सरस्वती पुजनाने झाली . सोहळ्याचे अध्यक्ष स्थान दत्तुपंत गुरुजीनी भूषवले . प्रमुख पाहुणे लोकनेते अविनाश भाऊ निलमवार , निमा जिल्हा उपाध्यक्ष डॉ राहुल माका , लक्ष्मणराव कंधारकर , पत्रकार संतोष मनधरने , संभाजी ब्रिगेड उप शहर अध्यक्ष डॉ. सुनील जाधव , मुबिन सर , परमेश्वर इंगोले पाटील, विश्वनाथ माका , फुलारी काका , बिरादार सर , संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक बालाजी जाधव सर , दुडकावार सर , दिलीप बिरादार सर , जिजाऊ ब्रिगेड च्या वैशाली सुनील जाधव , यशमवार ताई यांचा सत्कार करण्यात आला .प्रास्ताविक सूर्यकांत इंगोले सर यांनी केले .यात त्यांनी त्यांच्या त्यांच्या द्वारे राबवल्या जाणाऱ्या सर्व उपक्रमावर प्रकाश टाकुन गुणवंत विद्यार्थ्यातुन राष्ट्र सशक्तीकरण करण्याचे अविरत कार्य करणार असे .प्रतिपादन केले ..यानंतर युनीक अकॅडमीमध्ये शिकुन ज्या विद्यार्थ्यांनी राज्यात , जिल्हात , तालुक्यात वेगवेगळ्या परीक्षामध्ये जास्त गुण घेऊन कुणी NEET, B. Tech computer science / JEE Main, Sat Exam , स्पर्धा परिक्षामध्ये यश मिळवले व यशाच्या शिखरावर भरारी घेतली असे तन्मय राहुल माका , कुणाल विश्वनाथ माका , केतन जाधव , वैष्णवी दुडकावार , साक्षी दिलीप बिरादार , श्वेता अशोक पाटील , श्रुतीका यशमवार , प्राची बोइनवाड , मोहीत अविनाश निलमवार , अनंता सुनील जाधव या गुणवंत विद्यार्थ्याचा पदक देऊन सन्मान करण्यात आला . यावेळी तन्मय माका , वैष्णवी दुडकावार, श्वेता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले . या वेळी प्रमुख वक्ते मुबिन सर यांनी विस्त्रूत मार्गदर्शन केले . पालक अविनाश निलमवार , डॉ. सुनील जाधव यांनी मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . डॉ. सुनील जाधव यांनी सुत्र संचालन करत इन्साफ की डगर पे बचौ दिखाओ चल के गीत गाऊन विद्यार्थ्यांचा गौरव केला . पालकां सोबत संवाद साधत मेळावा संपन्न केला . आभार गजानन इंगोले सर यांनी व्यक्त केले .युनीक अकॅडमी च्या सर्व शिक्षकांनी सोहळा यशस्वीरीत्या पार पाडले.