
प्रा.भीमराव दिपके
सिंधू महाविद्यालय देगलूर
आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात राजश्री शाहू महाराजांचे नाव आदर्श राजा, बहुजन व दलित समाजाचे नेते प्रजाहित दक्षक राजा अशा संबोधितांनी उल्लेख केले जाते लोकनेते राजश्री शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यातील 26 जून 1874 रोजी झाला त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते
त्यांनी महाराष्ट्रातील प्रथम शिक्षणाचे मोफत कायदा त्यांनी केलेला आहे त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात आपल्या संस्थानातून सुरू केली बहुजन समाजातील लोकांना मोफत आणि शक्तीचे शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्या काळात फक्त एकच वर्ग शिक्षण घेत होता त्यासाठी त्यांनी तळागाळातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी 1917 मोफत आणि सक्तीचा कायदा त्यांनी केला.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाप्रमाणेच समाजातील जातिभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी संस्थानातील सार्वजनिक पानवटे आणि मंदिरे सर्वांसाठी खुली केली गंगाराम कांबळे या महार व्यक्तीला कोल्हापूर शहरातील भर रस्त्यावर हॉटेल काढून दिले व स्वतः चहा घेऊ लागले व जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रात प्रथम कार्य केले.
राजर्षी शाहू महाराज खऱ्या अर्थाने बहुजन समाजाच्या कल्याणाची काम त्यांनी केले शेतकऱ्याच्या हितासाठी त्यांनी जलसंधारणाचे काम राधानगरी धरणाच्या माध्यमातून त्यांनी केलेले आहे. उद्योगधंद्याच्या निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांनी 1895 मध्ये शाहूपुरी या बाजारपेठेची निर्मिती केली राजर्षी शाहू महाराजांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी भोगावती धरणाची निर्मिती केली मोफत सक्तीचा कायदा 1917 निर्माण करून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा हिताचे काम त्यांनी केले. राजश्री शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्तीची मदत केली म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार शिल्पकार झाले भारतीय संविधानाच्या माध्यमातून आज बहुजन समाजातील प्रत्येक नागरिकांना मोफत विविध कायदे अधिकार व तसेच शिक्षण घेण्याचा अधिकार राजश्री शाहू महाराजांनी व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक क्रांतीने मिळालेला आहे राजश्री शाहू महाराजांचे विचार हे बहुजन समाजातल्या सर्वांनी अंगीकारण काळाची गरज आहे कारण राजश्री शाहू महाराज हे संपूर्ण समाजातल्या उन्नतीसाठी आपले आयुष्य वेचले होते त्यासाठी कोल्हापूरच्या संस्थानापासून ते संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शाहू महाराजांच्या नंतर महाराष्ट्रामध्ये त्यांचेच विचार अंगीकारून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी देखील पंढरपूर येथे शैक्षणिक संस्था सुरू करून मागासलेल्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी देखील 1919 मध्ये
रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण त्यांनी दिले राजश्री शाहू महाराजांच्या विचाराने आज अनेक सामाजिक उन्नतीच्या योजना पुढे आलेल्या आहेत राजश्री शाहू महाराजांमुळे आरक्षणाचा मिळालेले आहेत आज राजश्री शाहू महाराजांमुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना अनेक शिष्यवर्ती मिळत आहेत राजश्री शाहू महाराजांनी समाजातली अंधश्रद्धा जातीयता नष्ट करण्याचं काम त्यांनी केलं म्हणूनच राजश्री शाहू महाराजांच्या विचाराची पुन्हा एकदा एकविसाव्या शतकातील बहुजन समाजाला काळाची गरज आहे…