
लोह्यातील सकल मराठा समाजाची मागणी…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
लोहा :- अर्धापूर तालुक्यातील देळुब येथील मतिमंद १३ वर्षीय बालिकेवर अमाणुष रित्या लैंगिक अत्याचार झाला असुन आरोपी राहुल चांदोजी वाघमारे वय ३० याला अर्धापूर पोलिसांनी अटक केले आहे .
सदरील घटना ही माणुसकीला काळीमा फासणारी असुन तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. हरामखोर प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच कडक शिक्षा झाली नाही तर समाजात अशाच घटना घडत राहतील त्यामुळे या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी लोह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक लोहा यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी विजय पाटील चव्हाण , माऊली पाटील पवार , प्रा बाळासाहेब जाधव , नंदाजी पाटील इंगळे , भानुदास पाटील पवार , केशव पाटील पवार , निळकंठ वडजे , बालाजी नळगे , गोपाळ जाधव सह आदिंची उपस्थिती होती…