
दैनिक चालू वार्ता
उपसंपादक धाराशिव
नवनाथ यादव
भूम:-शहराच्या अवघ्या पाच किलोमीटरच्या अंतरावर बालाघाटाच्या डोंगर कुशीमध्ये विस्तीर्ण अशा झाडा झुडपाच्या व विपषणा केंद्र ध्यान केंद्र स्थित असलेल्या जवळपास दोन अडीचशे एकर जमिनीवर असलेल्या या ध्यान केंद्राचं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांनी लोकांना निरोगी राहता यावं लोकांना विविध अशा प्रकारच्या वनस्पती या माध्यमातून मिळाव्यात लोकांना आरोग्यदायी आनंदी जीवन मिळावे लाभावे यासाठी या ध्यान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस इतका व्यस्त झालेला आहे हे त्याला आपल्या आरोग्याकडे आपल्या शरीराकडे बघण्यात का सुद्धा वेळ राहत नाही परंतु यातून वेळ काढून आपण हाडोंग्री या ठिकाणी ध्यान केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी तालुक्यातील सर्व लोकांना तामिळनाडू येथील शिक्षका आणू ललिता या ध्यान कसे करायचे यापासून आपल्या शरीराला आपल्या मेंदूला काय मिळते आणि आनंदी जीवन कसे जगता येईल यासाठीचे धडे या माध्यमातून उपस्थित साधकांना देण्यात आले.ध्यान केंद्राचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदित्य पाटील हे काम पाहत आहेत. लोकांनी या ध्यान केंद्रात येऊन ताण-तणावाच जीवन बाजूला ठेवून आपल्याला सुख समाधान शांती व आरोग्य मिळावे यासाठी आपण या ध्यान केंद्रात यावे विस्तीर्ण व प्रशस्त निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व विविध औषधी वनस्पती असलेल्या या भागामध्ये मंत्र्यापासून खासदारापर्यंत पोलीस अधीक्षकापासून ते प्रशासनापर्यंत अनेक अधिकाऱ्यांनी भेट देऊन या प्रकल्पाचे कौतुक केल्याचे दिसत आहे. म्हणून एक वेळ भेट देण्याचे आव्हान देखील आदित्य पाटील करताना दिसत आहे.